प्रतिनिधी -निशिकांत रोडगे सेलू

सेलू: येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभि महोत्सवानिमित्त प्रॉस्परस पब्लिक स्कूल या शाळेचे स्पिरीचूअल टूर ऑफ इंडिया हा सांस्कृतिक कार्यक्रम विद्याविहार संकुल येथे पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा . श्री. रवि डासाळकर कृ. ऊ. बा. समिती सेलू, व मा. श्री. तुकाराम कदम मुख्याधिकारी न. प. सेलू यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सविता रोडगे, रामेश्वर गटकर , गणेश काटकर, अन्वर पठाण, सुशील नाईक नवरे , अशोक शेलार , काका आवटे , डॉ. अपूर्वा रोडगे
, तसेच पालक प्रतिनिधी सौ.पल्लवी आवटे , सौ अनिता वासलवार तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रगती क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी प्रतिवर्षी प्रमाणे प्रिन्स अवॉर्ड सौरभ मोगल तर प्रिन्सेस अवार्ड रिया टेंबरे यांना दिला गेला. या पुरस्काराने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे व प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार म्हणजे केवळ एका क्षेत्रातील यश नसून, विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचा सन्मान असतो. या मध्ये विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती, शिस्त आणि वर्तन, हजेरी, सहशालेय उपक्रम, क्रीडा नैपुण्य, नेतृत्व गुण आदीचे मुल्याकन करण्यात येते. यापुरस्कारातून विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास वाढतो, व्यक्तिमत्व विकाससह प्रोत्साहन मिळते.
सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या उद्धेशाने सुरभी महोत्सव आहे. एक महिन्याहून अधिक विद्यार्थ्यांनी केलेल्या सरावाचे सादरीकरण सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे केली जाते. त्यांना आत्मविश्वास व प्रोस्ताहन उपस्थित पेक्षकाकडून अपेक्षित आहे. आमचा विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर रहावे या दृष्टीकोनातून अश्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. असे बोलताना डॉ. संजय रोडगे म्हणाले.
सेलू शहर हे मराठवाडयाची सांस्कृतिक राजधानी असून श्रीराम प्रतिष्ठाने आपल्या आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामधून सेलू शहराची एक वेगळी ओळख डॉ. रोडगे यांनी निर्माण केली आहे. उपस्थित पालकांना विनंती की, विद्यार्थ्यांना खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, भाषण अंगी उतरवले पाहिजे त्यांना प्रेरणा दिली पाहिजे. संस्कारची जडणघडण कश्यापद्धतीने करावयाची हे या शाळेतून दिसते. डॉ.रोडगे यांनी सुरभि महोत्सवातून बाल कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उभे केल्याचे दिसून आले असे प्रतिपादन तुकाराम कदम यांनी केले.
रामेश्वर गटकळ बोलताना म्हणाले की, सुरभि महोत्सव हा श्रीराम प्रतिष्ठानचा उल्लेखनीय उपक्रम असून डॉ. संजय रोडगे यांनी सेलू शहरात शैक्षणीक वातावरणास चांगले वळण देत असल्याचे आज प्रत्यक्षदर्शी येथे आल्यास दिसले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थांना व्यासपीठ तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध करून दिले हे विद्यार्थी दशेच्या दृष्टीने खुप महत्वाचे आहे.
या कार्यक्रमाचे प्रसंगाने सर्वांना धार्मिक क्षेत्रांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. आध्यात्मिक क्षेत्र हे मानवी जीवनाला केवळ भौतिक गरजांपुरते मर्यादित न ठेवता, त्याला एक सखोल अर्थ आणि आनंद देते, ज्यामुळे व्यक्ती स्वतःच्या सर्वात सुंदर आणि शक्तिशाली स्वरूपात जीवन जगू शकते. विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरणाचे सर्वांनी खूप कौतुक केले . या सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी शाळेतील विद्यार्थी, पालक सेलू शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन सारिका ताठे गीता सोनवणे यांनी केले.
