श्रीराम प्रतिष्ठान अंतर्गत प्रॉस्परस पब्लिक स्कूल सेलू या शाळेने एलिमेंट्री व इंटरमीडिएट ग्रेड परीक्षा 2025 मध्ये घवघवीत यश संपादन करून येथील विद्यार्थ्यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर यशाची परंपरा कायम राखली आहे.
एलिमेंट्री ग्रेड परीक्षेत एकूण 26 विदयार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी एक विद्यार्थी A ग्रेड घेऊन विशेष यश मिळवले आहे . तर 13 विद्यार्थ्यांनी B ग्रेड आणि 12 विद्यार्थ्यांनी C ग्रेड प्राप्त केले आहे.
तसेच इंटरमीडिएट ग्रेड परीक्षेसाठी एकूण दहा विद्यार्थी सहभागी झाले होते . त्यामध्ये सात विद्यार्थिनी. B ग्रेड तर03 विद्यार्थ्यांनं C ग्रेड प्राप्त केला आहे .
याप्रसंगी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रगती क्षीरसागर यांनी मुलांनी घेतलेल्या घवघवीत यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. आणि त्याच्या पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. मुलांच्या या यशामागे कलाशिक्षक सौ शितल आदमाने यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न दिसून येतो.