श्रीराम प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालयात लहान मुलांनी आठवडी बाजार भरवला होता. या मागचा उद्देश असा होता की, शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष अनुभवातून जीवनकौशल्ये शिकविण्याच्या उद्देशाने शाळेमध्ये लहान मुलांचा शालेय बाजार उत्साहात भरविण्यात आला. या उपक्रमात चौथी ते इयत्ता सातवी च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने सहभाग नोंदवला. अश्या या बाजारसाठी स्वतः श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, संस्थेच्या सचिव सौं. सविताताई रोडगे, उत्कर्ष विद्यालयचे मुखध्यापक श्री. कैलास ताठे, उद्धव येवले यांनी बाजारातील वस्तू खरेदी करून विध्यार्थ्यांच्या व्यहाराची तपासणी केली.
या शालेय बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध वस्तूंचे आकर्षक स्टॉल उभारले होते. वेगवेगळ्या भाज्या, फळे, केक, हस्तकला साहित्य, सजावटीच्या वस्तू, कागदी पिशव्या, चित्रे, खेळणी तसेच घरगुती पद्धतीने तयार केलेले खाद्यपदार्थ या वस्तूंनी बाजार फुलून गेला होता. लहानग्यांनी विक्रेता म्हणून ग्राहकांना हसतमुखाने वस्तू विकल्या, तर काही विद्यार्थ्यांनी ग्राहक बनून खरेदीचा आनंद घेतला. या उपक्रमातून मुलांना किंमत ठरवणे, पैसे मोजणे, सुट्टे पैसे परत देणे, वस्तूंची मांडणी करणे तसेच ग्राहकांशी संवाद साधणे यासारखी व्यवहारज्ञानाची महत्त्वाची कौशल्ये शिकता आली. यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव व संघभावना विकसित झाली. पालकांनीही या बाजाराला भेट देऊन मुलांच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले. डॉ संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शिक्षण अधिक आनंददायी व प्रभावी झाले. असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापक श्री. कैलास ताठे यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो.तसेच व्याहार ज्ञान मजबूत होते विध्यार्थी स्वालंबी होतात.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डिगंबर टाके यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. सचिन गव्हाने यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्कर्ष विद्यालयातील सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.