प्रतिनिधी – निशिकांत शिवाजीराव रोडगे
(सेलू) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी व स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून जीवनात यश मिळवण्या साठी अभिषेक कृषि प्रतिष्ठान ने मागील 18 वर्षा पासुन रवळगाव मधिल विद्यार्थ्यासाठी केलेले कार्य प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन बाजार समिती चे सभापती डॉ संजय रोडगे यांनी केले.
तालुक्यातील रवळगाव येथील अभिषेक कृषि प्रतिष्ठानच्या वतीने रविचार दिनांक 04 जानेवारी रोजी आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुणे येथील युनीक ॲकॅडमीचे डायरेक्टर प्रविण चव्हाण, प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी उदय जाधव, अशोकराव रोडगे, हभप सारंगधर महाराज रोडगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष आन्नासाहेब रोडगे, संयोजक उपविभागीय कृषि अधिकारी रामेश्वर रोडगे, डॉ सविता रोडगे, सौ. प्रतिभा रोडगे,सौ अर्चना रोडगे , सौरभ माळवे, डॉ आदित्य रोडगे, डॉ अपूर्वा रोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयत्ता 10 वी, 12 वी , शिष्यवृत्ती, नवोदय परिक्षा,तसेच वैद्यकीय , अभियांत्रिकी, कृषि, व्यवस्थापन , SET, NET,तसेच स्पर्धा परिक्षा अशा विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या रवळगावातील एकुण 65 गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांचा पालकांचा शाल, श्रीफळ , सन्मानचिन्ह व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी पुणे येथील युनीक ॲमॅडमीचे संचालक प्रविण चव्हाण यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत देशसेवा व करिअर च्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत त्यासाठी कठोर साधना, संयम आणि सातत्य या त्रिसुत्रीचा अवलंब करून यश मिळवण्याचा मंत्र दिला, तर गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी राज्य घटनेने दिलेल्या अधिकार व संधीचा योग्य उपयोग करून महिला, युवक व शेतकऱ्यांनी प्रगती करावी असे आवाहन केले. अनिकेत रोडगे, सौ शुभदा रोडगे यांनी Landslide करिअर च्या संधी बद्दल विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि अधिकारी राम रोडगे सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर अभिषेक रोडगे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ॲड बालासाहेब रोडगे, गणेश रोडगे, गुलाबआण्णा रोडगे, प्रल्हादराव रोडगे, भरत रोडगे, राम रोडगे, श्याम रोडगे, सुंदरतात्या रोडगे, विलास रोडगे , संतोष रोडगे, दिपक रोडगे व अभिषेक कृषि प्रतिष्ठान च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले, गावकऱ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

