प्रतिनिधी घनसावंगी
घनसावंगी तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे म. चिंचोली,विरेगांव तांडा,भेंडाळा, जांब समर्थ येथील शेतीचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. पंकजाताई मुंडे यांनी पाहणी केली.पाहणीदरम्यान पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या.या वेळी घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिकमत दादा उढाण,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र तौर महायुतीचे पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. पंकजाताई मुंडे यांनी पाहणी केली.पाहणीदरम्यान पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांशी संवाद