
प्रतिनिधी – निशिकांत रोडगे सेलू
सेलू श्रीराम प्रतिष्ठान अंतर्गत फिन किड्स मध्ये नुकताच प्री प्रायमरी विभागातील मुलांसाठी ‘रेड डे’ (लाल रंग दिवस) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुलांमध्ये विविध रंगांची ओळख निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील कल्पकता वाढावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थी आणि शिक्षक लाल रंगाच्या आकर्षक पोशाखात शाळेत आले होते. संपूर्ण शाळा आणि वर्गखोल्या लाल रंगाचे फुगे, रिबिनी आणि लाल रंगाच्या विविध वस्तूंच्या प्रतिकृतींनी सजवण्यात आल्या होत्या. यामुळे वातावरण अत्यंत प्रसन्न आणि चैतन्यमय दिसत होते. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच या दिवसाचा खरा विजय असल्याचे शिक्षकांनी नमूद केले.
यावेळेस श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे तसेच शाळेचे मुख्याध्यापिका सौ.प्रगती क्षीरसागर व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते.
