
अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १३ कोटी ७५ लाख रूपये किमतीचा अमली पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या ड्रग्सचा साठा जप्त केलाय. याप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील खंडाळा-दिघी रस्त्यावरून ड्रग्सची तस्करी होणार असल्याच्या माहितीवरून श्रीरामपूर पोलीस पथकाने सापळा रचत एक संशयित टॅम्पो अडवला. पोलिसांची ही शंका खरी ठरली.
