
रवी जयस्वाल, जालना : विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे-शिवसेना यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मराठी माणसासाठी एकत्र यावे लागेल, अशा आशयाचे विधान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना केले होते. त्यांच्या विधानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. संपूर्ण राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.
