जिल्हा युवा अधिकारी, परभणी व मेरा युवा भारत केंद्र, परभणी तसेच श्रीराम प्रतिष्ठान, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू यांनी घवघवीत यश संपादन करत एकाच दिवशी तब्बल 13 चषकांवर आपले नाव कोरले आहे.
दि. 16 डिसेंबर रोजी श्रीराम प्रतिष्ठानच्या मैदानावर संपन्न झालेल्या या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता निश्चित केली.
स्पर्धेतील यशस्वी कामगिरी पुढीलप्रमाणे :
🔹 खो-खो (18 वर्षांखालील मुली) – प्रथम क्रमांक
🔹 कबड्डी (18 वर्षांखालील मुले) – प्रथम व द्वितीय क्रमांक
🔹 100 मीटर धावणे (मुले)
1. अरुण फोले – प्रथम
2. संभाजी खोकले – द्वितीय
3. एकनाथ माघाडे – तृतीय
🔹 100 मीटर धावणे (मुली)
1. प्रतिभा माघाडे – प्रथम
2. मनीषा धनवे – द्वितीय
3. रंजनी दारशिंबे – तृतीय
🔹 गोळा फेक (मुले)
1. संभाजी खोकले – प्रथम
🔹 गोळा फेक (मुली)
1. मनीषा धनवे – प्रथम
2. रजनी धांडे – द्वितीय
3. वैशाली कसदेकर – तृतीय
या उल्लेखनीय यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, सदस्य डॉ. आदित्य रोडगे, अॅड. दत्तराव कदम (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, सेलू), श्री. माऊली ताठे (संचालक, कृ.उ.बा. समिती, सेलू), प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य प्रा. कार्तिक रत्नाला, प्रा. प्रगती क्षिरसागर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.
या खेळाडूंना सुरज शिंदे, कपील ठाकूर, प्रमोद गायकवाड, मुन्ना शेख, कुणाल चव्हाण, आकाश पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजयी खेळाडूंना पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.