-प्रिंस इंग्लिश स्कूल, सेलू येथील अष्टपैलू खेळाडू कोमल पौळ आणि वेगवान गोलंदाज यश मगर यांची शिर्डी येथे होणाऱ्या शालेय १७ वर्षाखालील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाल्याने शाळेत आनंदाचे वातावरण आहे. दोन्ही विद्यार्थ्यांच्या समर्पण, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाचे फळ त्यांना मिळाले आहे.
-या यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षक कपिल ठाकूर व प्रमोद गायकवाड सूरज शिंदे यांनी आनंद व्यक्त केला असून शाळेचे प्रमुख कार्तिक रत्नाला, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे आणि सचिव डॉ. सविता रोडगे यांनी कोमल व यशचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
-यश व कोमल यांच्या पालकांनीही मुलांच्या निवडीबद्दल समाधान व्यक्त केले असून शाळेने दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आभार मानले. -“शाळेच्या प्रेरणेमुळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच ही कामगिरी शक्य झाली,”- असे पालकांनी सांगितले.-
दोनही विद्यार्थी आगामी राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करतील, अशी सर्वांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.