प्रतिनिधी -निशिकांत रोडगे सेलू
सेलू :तालुक्यातील कसुरा नदी पात्रातून म्हाळसापुर शिवारात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सूरू असून स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी त्रस्त झाले आहेत.अवैध वाळू उपसाला मंडळ अधिकारी, तलाठ्यासह पोलीस प्रशासनाचा वरदहस्त मिळत आहे. अवैध उपसा करणाऱ्यांना प्रशासनातील कर्मचा-याकडून मूक संमती मिळत आहे का?असा प्रश्न निर्माण झाला आहे.रात्रीच्यावेळी ट्रॅक्टर धावत असल्याने ग्रामस्थांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. कसुरा नदीवरील म्हाळसापुर, कुंडी, देऊळगाव, रवळगाव येथून दररोज रात्री 20-30 ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळूचा उपसा केला जात आहे.यामुळे नदीपात्राची झीज, भूजल पातळीतील मोठी घट आणि पर्यावरणाचा समतोल बिघडला जात आहे.
◾प्रशासनाकडून निष्क्रियता — ग्रामस्थांमध्ये नाराजी
ग्रामस्थांनी महसूल व पोलीस विभागाच्या अनेकदा निदर्शनास आणून दिले आहे. मात्र, उशिराने होणारी किंवा प्रतिकात्मक कारवाई यामुळे अवैध उपसा थांबण्याऐवजी अधिकच वाढला जात आहे.या अवैध वाळू उपसामूळे शेतक-यांना शेतात जाणा-या रस्त्याची चाळणी झाली असून शेतक-यांना शेतमाल आणण्यासाठी त्रासाचा सामना करावा लागत आहे.
◾शासनाला लाखोंचा महसूल बूडाला
तालूक्यात सरर्सासपणे होत असलेल्या या अवैध वाळू उपसामूळे शासनाचा लाखोचा महसूल बूडत आहे .मात्र वाळू माफिया जोमात असून महसूल विभागा कोमात असेच म्हणावे लागेल.
