क्रीडा व युवक सेवा संचनालाय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी आणि एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू आयोजित विभागीय क्रिकेट स्पर्धेत एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलने घवघवीत यश मिळवले आहे.
दि.28 नोव्हेंबर रोजी नूतन महाविद्यालय सेलूच्या मैदानावर संपन्न झालेल्या विभागीय क्रिकेट स्पर्धेत एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या *17 वर्षाखालील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला* तसेच *यश मगर आणि कोमल पौळ* या दोन खेळाडूंची राज्यस्तरीय निवड चाचणी साठी निवड झाली या खेळाडूंना प्रमोद गायकवाड,कपिल ठाकूर,सुरज शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूचे डॉ. संजय रोडगे, संचालक अँड . दत्तराव कदम, धोंडगे साहेब, श्री. लोकुलवार अण्णा, प्रशांत नाईक, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्रिंसिपल प्रा . कार्तिक रत्नाला, प्रगती क्षिरसागर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.