सेलू, ता. २५ ऑक्टोबर
वार शनिवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, सेलू यांच्या वतीने समितीच्या मुख्य कापूस यार्ड, पाथरी रोड येथे जनावरांचा बाजार भव्य उत्साहात भरवण्यात आला.
बाजार समितीच्या स्थापनेपासून प्रथमच जनावरांचा बाजार समितीच्या यार्डमध्ये भरवण्यात आला असून, याआधी हा बाजार नगरपरिषद अंतर्गत होत होता. मात्र तो खूप वर्षे झाले बंद होता. सभापती डॉ. संजय रोडगे यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक निर्णय प्रत्यक्षात आला.
जनावरांच्या बाजाराचा शुभारंभ सभापती डॉ. संजय रोडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे संचालक अँड. दत्तराव कदम, श्री. केशव सोळंके, श्री. भास्करराव पडघन, श्री. ज्ञानेश्वर राऊत, ॲड. कृष्णा शेरे, प्रभारी सचिव दीपक शिंगणे तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.
आजच्या बाजारात सतरा जनावरांचे व्यवहार पार पडले. प्रमुख व्यापाऱ्यांमध्ये नूर मे शामुद्दीन, रजाक भाई कुरेशी, शकील कुरेशी, शेख युनुस शेख चांद, दिगंबर आवस्कर, रामेश्वर घुले यांचा समावेश होता.
कार्यक्रमात सभापती डॉ. रोडगे यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांशी संवाद साधत, जनावरांच्या बाजारासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. कृष्णा शेरे यांनी केले, तर संचालक दत्तराव कदम यांनी पुढील जनावरांच्या बाजारात शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
स्थानिक नागरिकांमध्ये चर्चेचा विषय — *“एक उच्च विद्या विभूषित व्यक्ती जेव्हा पदावर येते तेव्हा परिवर्तन शक्य होते”* याचे जिवंत उदाहरण म्हणजे डॉ. संजय रोडगे. मागील महिनाभरात त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केलेले सकारात्मक बदल जनतेच्या लक्षात आले असून, सर्वत्र त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.