प्रतिनिधी -निशिकांत रोडगे
*दिवंगत सभापतींच्या प्रतिमांचे अनावरण*
सेलू (दि. 22 ऑक्टोबर 2025) — दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कापूस यार्डमध्ये कापसाच्या जाहिर लिलावाचा शुभारंभ समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या लिलावात लाडनांद्रा येथील शेतकरी श्री. आसाराम तुळशीराम सागडे यांच्या कापसाला ₹7200 प्रति क्विंटल असा कमाल दर मिळाला, तर कवठा येथील शेतकरी श्री. लहू सीताराम शिंगारे यांच्या कापसालाही ₹7200 प्रति क्विंटल दर मिळाला.
या दोन्ही शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ व फेटा बांधून मा. सभापती डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बाजार समितीचे संचालक अँड. दत्तराव कदम, प्रसाद डासाळकर, केशवराव सोळंके, माउली ताठे, रामेश्वर राठी, तसेच कापूस खरेदीदार जिनिंगधारक आशिष बिनायके, गोपाळ काबरा, निर्मल जैन, प्रभुदयाल मंत्री, ग्लोबल जिनिंगचे प्रतिनिधी, सि.सि.आय.चे सेलू केंद्र प्रमुख नितीन भरणे, व बाजार समितीचे प्रभारी सचिव दीपक शिंगणे, एकनाथराव राऊत व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
समितीच्या मुख्य कार्यालयात दिपावली पाडव्याच्या निमित्ताने व्यापारी बंधू, आडते, खरेदीदार व मान्यवरांसाठी नाश्ता, चहापाणी व पान-सुपारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी बाजार समितीच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत कार्यरत राहिलेल्या दिवंगत सभापती कै. दगड्डु आबा झोडगावकर, कै. रंगनाथ पाटील कदम, कै. रावसाहेब वाघ, कै. दत्तराव (जिजा) मोगल यांच्या प्रतिमांचे अनावरण त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आले.
सभापती डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते सर्व कुटुंबीयांचे शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यानंतर समितीच्या कार्यालयासाठी नवीन संगणक उपकरणांचे पूजन मा. सभापती व त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास अँड. दत्तराव कदम, प्रसाद डासाळकर, केशवराव सोळंके, माउली ताठे, रामेश्वर राठी आदी मान्यवर उपस्थित होते.
